Download Songs

  1. Oth
  2. Download Mandar Agashe - Asha Bhosle - Suresh Bhat Songs - 82Pop Music Album

Album

केव्हा तरी पहाटे, उष:काल होता होता, मी मज हरपून बसले गं, मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी... या सर्व गाण्यांमध्ये साम्य काय? शब्दांची दैवी देणगी लाभलेले गझलकार सुरेश भट यांचे शब्द आणि दैवी स्वरांचं लेणं लाभलेल्या आशा भोसले यांचा मधाळ स्वर यांच्या अद्वैतातून जन्मलेली ही गाणी मराठी संस्कृतीचा चिरकाल ठेवा आहेत. ‘सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?’ असा आर्त सवाल करणाऱ्या आशाताई आज वयाच्या ८२व्या वर्षी, सहस्त्रचंद्रदर्शानंतरही तितक्याच तरुण आवाजात पुन्हा सुरेश भटांच्या गझला घेऊन रसिकांसमोर येत आहेत. ‘८२’ असंच या ध्वनिफितीचं नाव असून सुरेश भटांच्या आशयघन, आर्त, घनव्याकूळ गझलांना पॉपच्या झिंगबाज आवरणात लपेटून मंदार आगाशे या तरुण संगीतकाराने ही ध्वनिफीत सजवली आहे.

सुरेश भटांच्या सिद्धहस्त, ओघवत्या लेखणीतून उतरलेल्या सहा गझलांचा या ध्वनिफितीत समावेश आहे. ओठ, आसवांचे, बरसून, हा असा चंद्र, तोरण आणि दिवस हे जाती कसे या सुरेश भटांच्या सहा गजला या ध्वनिफितीसाठी निवडण्यात आल्या आहेत. मंदार आगाशे या तरुण संगीतकाराने या गझलांना आपल्या संगीताने सजवलं आहे.

यासंदर्भात आशाताई म्हणाल्या, “सुरेश भट यांच्याशी अनेक वर्षं माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याविषयीच्या असंख्य आठवणी आहेत. या ध्वनिफितीच्या निमित्ताने त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. सुरेश भट यांच्या शब्दांची ताकद काय आहे, हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या ध्वनिफितीच्या निमित्ताने ती ताकद पुन्हा अनुभवता आली. मंदारच्या संगीताची जी पॉप,रॉक शैली आहे, त्या शैलीत माझ्या आवाजात आपल्या गझला रेकाॅर्ड व्हाव्यात, अशी भट साहेबांची खूप इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण होत असल्याचा आनंद असला तरी भट साहेब या गझला ऐकायला आपल्यात हवे होते.”

यासंदर्भात मंदार म्हणाला, “१९९४ साली प्रथम सुरेश भट यांना भेटलो तेव्हापासूनच माझ्या इंग्लिश पॉप संगीताच्या शैलीत आणि आशाताईंच्या आवाजात सुरेश काकांच्या गझलांची ध्वनिफीत करावी, अशी त्यांचीच इच्छा होती. आज सुरेश काका हयात नाहीत, पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. हया अल्बम चे म्युझिक अॅरेंजमेंट डेरेक ज्यूलियन आणि ड्रमचे अरेंजींग पर्कशनिस्ट रवी वेदांत यांनी केले आहे, तसेच या ध्वनिफितीसाठी मेंटरींग धनश्री गणात्रा यांनी केले आहे.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘हे गीत जीवनाचे’ या चित्रपटातील ‘खुळ्या खुळ्या रे पावसा’ हे मंदारचं पहिलं गाणं. पंडितजींनी स्वत: बोलावून मंदारला हे गाणं करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याने १९९६ मध्ये प्रथमच सुरेश भट यांच्या गझलांचा समावेश असलेल्या ‘अचानक’ या ध्वनिफितीची निर्मिती केली होती.

‘८२’ या ध्वनिफितीच्या निमित्ताने www.82pop.in या संकेतस्थळाची निर्मितीही करण्यात आली असून त्यावर एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ८२ या ध्वनिफितीतील गाण्यांवर चाहत्यांनी जमेल तसे व्हिडिओ करून या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. आशाताई स्वत: त्यांना आवडलेल्या व्हिडिओंची निवड करून त्यानंतर व्यावसायिक पद्धतीने अंतिम म्युझिक व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे.

What is the link between songs like 'Kevha Tari Pahate', 'Ushakkal Hota Hota', 'Mi Maja Harpun Basle Ga' and 'Tarun Aahe Ratra Ajuni'? Well, all these songs have taken birth through the writings of ace Marathi poet Suresh Bhat and the melodious voice of the evergreen Asha Bhosle, who, at the age of 82, sings with the same youthfulness and passion that defines her.

And that is exactly why '82', a Marathi pop album by Mandar Agashe, brings back the magic of Suresh Bhat's songs through Asha Bhosle's voice and is sure to strike a chord with listeners. In this endeavour, Mandar Agashe has decorated six of Suresh Bhat's ghazals (including 'Oth', 'Aasavanche', 'Barsun', 'Ha Asa Chandra', 'Toran', and 'Divas He Jaati Kase' with his musical touch of pop, reggae, blues, and rock.

About the album '82', Asha Bhosle said, "I had a long association with Suresh Bhat and have a lot of memories about him. With this album, I will relive those memories. I don't need to tell you how powerful his words were and, with the album, that power can be experienced again. Mr. Bhat always wanted to record these ghazals in the pop and rock genres and it is good to see Mandar fulfilling that wish. I just wish Mr. Bhat was among us today."

Mandar added, "I met Suresh Bhat for the first time in 1994 and since then he had the desire to record his ghazals sung by Asha Bhosle in the pop genre. Today, Suresh Kaka isn't among us but his dream has come true. The music arrangement of the album has been done by Derek Julian, while Ravi Vedant has arranged the drums and percussions."

The song 'Khulya Khulya Re Pavasa' from Pandit Hridaynath Mangeshkar's film 'He Geet Jivanache' was Mandar's first song and it was Pandit ji who has specifically asked Mandar to do the song. Thereafter, Mandar produced the Marathi album 'Achanak'.

Artists

Asha Bhosle New Music Album

Asha Bhosle

Singer

Marathi Poet Suresh Bhat

Suresh Bhat

Poet

Mandar Agashe - Music Director

Mandar Agashe

Music Director

Derek Julien - Music Arranger

Derek Julien

Music Arranger

Ravi Vedant - Drummer & Percussionist

Ravi vedant

drummer and percussionist

Joy Dev Guha - Geet Audiocraft Studio

Joy Dev Guha

Geet Audiocraft Studio

NOBO - Recording Engineer

Nobo

Recording Engineer

Videos

Contest

With '82', the fans of Suresh Bhat and Asha Bhosle have the golden opportunity of participating in a unique 'Music Video' competition.

Instructions:
1. Download any song free from the Download section.
2. Shoot a music video for the song with a mobile camera or a professional camera.
3. Email the music video or the link of the video file to contest@82pop.in
Note: You can submit music videos for multiple songs as well as multiple videos for the same song.

Selection and Reward:
Asha Bhosle and Mandar Agashe will personally choose a video that both like the most. The chosen video will be released as the official music video of that song, with due credit to the winning contestant.

Last date of submission:
08 June 2016

Contact

Please give us your feedback on below mail id's

mandar@82pop.in asha@82pop.in